सांगोला येथे गुटख्याची तस्करी १९ लाखाच मुद्देमाल, जप्त तिघा जणां विरुद्ध गुन्हा दाखल


पंढरपूर/प्रतिनिधी:

सांगोला येथे भाजीच्या टेम्पोमधून अवैधरित्या १९ लाख रुपये किमतीचा गुटख्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली.  पुणे येथे जाणाऱ्या टेम्पोची पोलिसांनी कसून चौकशी केली असता टेम्पोमध्ये गुटखा, पान मसाला, विमल, सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले आहे. बुधवार ५ मे रोजी दुपारी सांगोला महुद रोडवर घडली आहे. गुरुवारी सहा मे रोजी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये हसन शिरा शेख (रा. कोंढवा पुणे), अल्लाबक्ष अब्दुलगणी बागवान (रा. जवळकोट ता. तुळजापूर)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर पुणे येथील मूळ मालक बालाजी कले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


तंबाखूजन्य पदार्थ असणाऱ्या १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सचिन देशमुख ,पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगोला महुद रोडवर संशयावरून (एम. एच. १४ जी. डी. ५२४४) या क्रमांकाचा टेम्पो अडविला असता.  सदर टेम्पोमध्ये वरील बाजूस बोंबील, आले, लसूण ,कांदा, टोमॅटो दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी साठी टेम्पो पोलिस ठाण्यात आणला. सदर टेम्पोतील वरील बाजूस कांदा टोमॅटो लसूण आले व बोंबील आदी माल आढळून आला तर आतील बाजूस ३४ पोती (भोद) यामध्ये गुटखा असल्याचे निदर्शनास आले. टेम्पोमध्ये गुटखा, पान मसाला, विमल, सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. सुमारे १९ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

तीन जणांविरुद्ध  गुन्हा दाखल

याबाबत सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चालक हसन शिरा शेख, अल्लाबक्ष अब्दुलगणी बागवान यांना अटक करण्यात आली. तर मूळ मालक असणाऱ्या बालाजी कले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. सोलापूर येथील अन्न व भेसळ कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मंगेश लवटे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments