एका व्यक्तीने विवाहीत प्रेयसीला आपल्या मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यास दबाव टाकला. मात्र महिलेने तसं करण्यास नकार दिला. याच रागातून आरोपीने टोकाचं पाऊल उचललं.
संबंधित घटना ही पुण्यातील थोरांदळे गावातील आहे. मृत झालेली महिला रांजणी येथे बाजरीच्या पिकाची राखण करण्यासाठी आली होती. तेथे तिची ओळख आरोपी सोबत झाली. याच ओळखीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. काही दिवसांनंतर आरोपीने आपल्या प्रेयसीला त्याच्या मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास दबाव टाकला. दबाव टाकून देखील प्रेयसीने नकार दिल्याने आरोपील प्रचंड राग आला. याच रागातून आरोपीने आपल्या प्रेयसीला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी आरोपीने आपल्या मित्रासोबत कट रचला. त्यानंतर आरोपीने आपल्या मित्रासोबत मिळून प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर दोन्ही आरोपींनी मिळून महिलेचा मृतदेह अंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे नेऊन टाकला.
दरम्यान, गावातील लोकांनी मृतदेह पाहताच पोलिसांना याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणाची तपासणी केली. त्यानंतर आरोपींचा शोध लागताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
0 Comments