सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात अनेकजण भरपूर पैसे कमवीत आहे. यात राजकीय नेत्यांकडूनही आता सोशल मीडियाचा प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ लागला आहे.
राजकीय पक्षात सर्वाधिक सोशल मीडियाचा वापर हा भाजपकडून केला जात असून यातील प्रभावी नेतृत्व असणारे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडूनही सोशल मीडियाचा जास्त वापर केला जात आहे. मात्र सोशल मीडियातुन कमाईहीही होत असल्याचं गडकरी यांनी सांगितले आहे. गडकरी यूट्यूबच्या माध्यमातून सुमारे महिनाकाठी ४ लाख रुपयांची कमाई करत असल्याची माहिती त्यांनी स्वतः एका कार्यक्रमावेळी दिली आहे.
आता भाजपतील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाच्या वापरातून प्रसिद्धी मिळवळीच आहे. शिवाय ते आता बक्कळ पैसाही कमवू लागले आहेत. त्यांनी भाजपातील इतर नेत्यांशी सोशल मीडियाद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला. यावेळी गडकरींनी कशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमविले याचे कारण सांगितले. ‘सोशल मीडियातील व्हिडीओद्वारे सुमारे ९५० व्हिडीओ कॉन्फरन्स घेतल्या. तातून १ करोड २० लाख सहयोगी बनले. या यूट्यूबच्या माध्यमातून मी दिलेल्या भाषणातून युट्युबकडून मला महिन्याला ४ लाख रुपये मिळायला सुरवात झाल्याची माहिती केंद्रीयमंत्री गडकरींनी दिली.
0 Comments