......राधिका आपटेने सांगितला करोना काळातील शूटिंगचा अनुभव


बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने लॉकडाउन होण्यापूर्वी अभिनेत्रीने कोलकतामध्ये चित्रपटाचे ४५ दिवसांचे शेड्युल पूर्ण केले. करोना काळातील या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव कसा होता हे राधिकाने सांगितले आहे.

राधिकाने स्वत:च याविषयीचा खुलासा केला, ती म्हणाली, “अनुभव काही वेगळा नव्हता, आम्ही वारंवार करोना चाचण्या करत होतो. आम्ही सगळेच जण तिथे बरीच सावधगिरी बाळगत होतो आणि आरोग्य व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करत होतो. त्याशिवाय इतर सर्व काही अगदी सारखेच होते.” हॉटेलपासून लोकेशनपर्यंत फक्त तेवढाच आवश्यक प्रवास करण्यात आला असून चित्रिकरणाशी संबंधित नसलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे रद्द केल्या गेल्या होत्या.

अनेक मुख्य मासिकांची मुखपृष्ठे आहेत तसेच, ‘ओके कॉम्प्यूटर’ या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाल्यानंतर राधिका लवकरच काही चित्रपटांमध्ये प्रमूख भूमिकेत दिसणार आहे. ज्यामध्ये ‘मिसेस अंडरकव्हर’ आणि काही अघोषित प्रकल्पांचा सहभाग आहे.

Post a Comment

0 Comments