पंढरपुरातील प्राध्यापकाची अध्यक्ष पवार यांच्यावरच पीएचडीचा प्रबंध सादर



पंढरपूर/प्रतिनिधी:

गेल्या पन्नास वर्षापासून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा असणाऱ्या व भारतीय राजकारनातले चाणाक्ष म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पंढरपुरातील चक्क प्राध्यापकांने पीएचडी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला शरद पवारांवर पीएचडी करायची आहे, अशी मिश्कील शैलीत टोला लगावला होता.  मात्र त्यांची ती इच्छा पंढरपूर शहरातील कर्मयोगी भाऊराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या दत्तात्रेय काळेल यांनी शरद पवार आमच्यावर पीएचडी पूर्ण केली आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाकडून शरद पवार यांच्यावरील शोधनिबंधला मान्यताही देण्यात आली आहे.

सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथे डॉ. प्रा. दत्तात्रेय काळेल राहणारे आहेत. पंढरपूर येथील कर्मयोगी भाऊराव पाटील महाविद्यालयांत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. मात्र त्यावेळेस त्यांना शरद पवार यांचे नेतृत्वगुणाचे आकर्षण होते. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात एम फिल करत असताना
'शरद पवार व महाराष्ट्रात पुरोगामी दलाचे शासन एक चिकित्सक अभ्यास' या विषयावर प्राध्यापक काळेल यांचा शरद पवार यांच्या याबाबत चिकित्सक पद्धतीने संशोधन करण्याची संधी मिळाली. १९७८ साली शरद पवार यांनी महाराष्ट्र सात पक्षाचे सरकार मिळून पुलोदचे सरकार स्थापन केले होते. मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी व त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची चिकित्सकपणे अभ्यास करून प्राध्यापक काळेल यानी संशोधन केले आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात कडून शरद पवार यांच्या केलेल्या संशोधनावर त्यांनी मान्यता दिली आहे.

खासदार शरद पवार यांची संशोधन संदर्भात भेट

पंढरपूर येथील कर्मयोगी भाऊराव महाविद्यालयात राज्यशास्त्राचे विभागप्रमुख म्हणून डॉक्टर दत्तात्रेय काळेल काम पाहत आहे. शरद पवार यांच्या संशोधन प्रबंधक तयार करत असताना प्रोफेसर काळेल यांची शरद पवार यांच्यासोबत दोन वेळा भेटही झाली आहे. व त्याच वेळी खासदार शरद पवार यांच्याबरोबर चर्चा करून प्रबंध तयार केला. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, एमडी पाटील, सुधाकरपंत परिचारक या दिग्गज नेत्यांची ही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. यासह खासदार सुप्रिया सुळे, खा. सुनील तटकरे, आमदार रोहित पवार यांच्याकडून शरद पवार यांच्या नेतृत्वाविषयी चर्चाही केली. प्रोफेसर कळेल हे संशोधन या सर्वांचा मार्गदर्शनाचा चांगला फायदा झाला आहे.  

शरद पवार यांनी ४२ वर्षानंतर तो प्रयोग महाविकास आघाडी सरकार

१९७८ साली शरद पवार यांनी महाराष्ट्रात असाच चमत्कार करून पुरोगामी लोकशाही दलाचे हा प्रयोग ४२ वर्षानंतर २०१९ साली शरद पवार यांनी राज्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांना एकत्रित आणून लोकशाही आघाडीचे सरकार आणून दाखवली आहे. याची आठवणही त्यांनी करून दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर पीएचडी करेन, असे विधान केले होते.  भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या पीएचडीच्या मुश्किल टिकेला आता पंढरपुरातील प्राध्यापकाने उत्तर दिल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments