सामाजिक कार्यकर्ते संतोष रेवणकर यांच्या वाढदिवस ३० मे रोजी असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच कोरोना पार्श्वभूमीवर नंगीवली तालीम येथे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
संतोष रेवणकर यांनी त्याच्या वाढदिनी सामाजिक बांधीलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, तालमीतील, तसेच मंगळवार पेठ परिसरातील व्यक्तींना हितचिंतकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केले आहे.
सकाळी नऊ वाजता शिबिराचे उद्घाटन श्री. विष्णु शेटे-बालकल्याण समिती सदस्य श्री.अविनाश कामते-युवासेना जिल्हा सरचिटणीस श्री. सचिन मांगले,श्री. गोपी पोवार- सामाजिक कार्यकर्ते, सौ. मनीषा गायकवाड- सामाजिक कार्यकर्त्या यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरामध्ये बालकल्याण संकुलमधील माजी मुले-मुली यांनी देखील रक्तदान करण्याची तयारी दर्शविली आहे, तालमीतील कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत याचबरोबर इच्छुकांनी देखील या शिबिरामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन श्री. संतोष रेवणकर यांनी केले आहे. शिबिरामध्ये जे काही रक्त जमा होणार आहे ते वैभवलक्ष्मी ब्लड बँकेकडे सुपूर्त केले जाणार आहे.
0 Comments