...अन् अभिनेत्रीचा माजी मंत्र्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; गर्भपातही केल्याचा आरोप



चेन्नई:

 एका प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवून तिचं लैंगिक शोषण  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  संबंधित पीडित अभिनेत्री तमिळ चित्रपटसृष्टीशी संबंधित असून  तिने अण्णा द्रमुकचे माजी मंत्री डॉ. मणिकंदन यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तिचे मागील काही वर्षांपासून डॉ. मणिकंदन यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोपही पीडित अभिनेत्रीने केला आहे. ही अभिनेत्री मुळ मलेशिया या देशाची असून मागील काही वर्षांपासून ती तमिळ चित्रपटसृष्टीत काम करते.

त्याचबरोबर, मणिकंदन यांच्या प्रेमसंबंधातून पीडित अभिनेत्री गर्भवती झाली असता, तिला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला. त्याच बरोबर घटनेची वच्याता कुठेही केली, तर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकीही मणिकंदन यांनी दिली असल्याचं अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवाय पुरावा म्हणून तिने मणिकंदन यांच्यासोबतचे काही फोटोही पोलिसांना दिले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments