दैनिक लोकपत्रचे संपादक रविंद्र तहकिक यांना राणे समर्थकांच्या कडून मारहाण



औरंगाबाद:  दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकिक यांच्या अंगाला काळ फासून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न नारायण राणे यांच्या समर्थकांनी केल्याचा आरोप संपादक तहकिक यांनी केला आहे. दै. लोकपत्र मध्ये छापून आलेल्या वृत्ताचा राग आल्याने हा प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले. 

सायंकाळी पाच ते सहा च्या दरम्यान औरंगाबाद येथील दै. लोकपत्रच्या कार्यालयात घुसून काही समर्थकांनी हे कृत्य केले आहे. राज्यातील अनेक पत्रकारांनी या कृत्याचा निषेध नोंदवला आहे. तहकिक यांनी देखील, बातमी आवडली अथवा चुकीची वाटली असल्यास कायदेशीर मार्गाने न्याय मागता येत होता, अशा पद्धतीने पत्रकारास मारहाण करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. 

काय होते बातमीत  ? 

संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा समाजचे नेतृत्व करण्याच्या घेतलेल्या भूमिकेबाबत निलेश राणे यांनी टीका केली होती. याच टीकेचा खरपूस समाचार दै. लोकपत्रच्या बातमीतून घेण्यात आला होता. या बातमीत असणाऱ्या तपशिलाचा राणे समर्थकांना राग आला असल्याने त्यांनी हे कृत्य केले असावे असा आरोप तहकिक यांनी केला आहे.  

Post a Comment

0 Comments