प्रियकर व प्रियेशी यांना नको त्या अवस्थेत पाहिले ; त्या रागातून गोड बोलून त्या इसमाचा प्रायव्हेट पार्ट कापला


बिहार:

बिहारमधील साहेबगंज तालुक्यातील विशुनपुर पट्टी मुशहर टोला येथून एक विचित्र बातमी समोर आली आहे. येथील एका महिलेने एका व्यक्तीला आपल्या जवळ बोलावलं आणि त्यानंतर डायरेक्ट त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 एका महिलेला तिच्या प्रियकरासोबत अश्लील आवस्थेत पाहिलं. यानंतर त्या महिलेला आपल्या बदनामीची चिंता सतावू लागली. हरिंदर आपले बिंग फोडू शकतो असं तिला वाटू लागलं. बदनामी टाळण्यासाठी तिने एक कट रचला.

महिलेने सर्वात आधी गोड बोलत ही गोष्ट कुणाला सांगू नकोस असं हरिंदरला सांगितलं. त्याला पूर्ण विश्वासात घेतलं. जेव्हा तिला समजलं की त्याला कोणत्याही प्रकारचा संशय नाही. त्यानंतर तिने त्याला आपल्या जवळ बोलावलं. तो तिच्या जवळ जाताच महिलेने प्रियकराच्या मदतीने त्याचा प्रायव्हेट पार्ट विळ्याने कापला.

दरम्यान, पीडित हरिंदरचे किंचाळणे ऐकून जवळचे लोक धावत आले, त्यांनी हरिंदर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. महिलेबाबत सांगितलं जात आहे की, तिने दोन विवाह केले आहेत, परंतु ती सासरी राहत नाही माहेरी राहते. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं असून तिचा प्रियकर फरार झाला आहे.

Post a Comment

0 Comments