उजनी पाणी संदर्भातील आदेश रद्द - जलसंधारण मंत्री जयंत पाटील


पंढरपूर/प्रतिनिधी:

उजनी धरण आतल्या पाच टीएमसी पाण्यावर सोलापूर व पुणे जिल्ह्यामध्ये राजकारण जोरात तापले होते. उजनी जलाशयातून बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनीतून शेटफळगडे या प्रकल्पाला देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. त्यातून इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी पाच टीएमसी पाणी निर्णय झाला होता. महा विकास आघाडी व पालकमंत्री भरणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात आंदोलन करण्यात आली होती. आज तो निर्णय माघारी घेणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. यावेळी आमदार संजय मामा शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, उमेश पाटील, उत्तम जानकर, निरंजन भूमकर आदींनी जलसंपदा मंत्र्यांची मंगळवारी भेट घेऊन निर्णय रद्दची मागणी केली होती.

उजनी पाणी वाटपावरून बरेच गैरसमज : जलसंपदा मंत्री

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार व स्थानिक नेत्यांनी उजनीच्या पाण्याबाबत आग्रही भूमिका मांडली आहे उजनी जलाशयातून सोलापूर जिल्ह्याला जे पाणी देण्यात येणार आहे त्या पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागणार नाही असे आश्वासनही देण्यात आले आहे. जलसंधारण विभागाकडे २० एप्रिल रोजी एका आदेश आले होते. २२ एप्रिल रोजी उजनीत येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्‍यातील २२ गावांना देण्यासंदर्भात निर्णय घेतला. त्यासंदर्भात बरेच गैरसमज झाल्याची कबुली जलसंपदा मंत्र्यांनी दिली. तो आदेश रद्द करून सुधारित आदेश काढले जातील, असेही त्यांनी मंगळवारी सांगितले. 

पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व इंदापूर चे आमदार दत्ता मामा भरणे यांनी उजनी जलाशयातून पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना द्यावा अशी मागणी केली होती त्यासंदर्भात आदेशही जलसंपदा विभागाकडून मंजूर करण्यात आला होता त्यानंतर सोलापूर येथे पत्रकार परिषदेमध्ये दत्ता मामा यांना याबाबत विचारणा झाली असताना त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी व अन्य बाबींचे झालेल्या पाण्याचे यातील एक थेंब जरी पाणी इंदापूर नेले तर मी राजकारण सोडून देईन, असे वारंवार पालक मंत्री व राज्यमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना व भाजप यांच्याकडून पालकमंत्र्यांविरुद्ध जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. या सर्व उजनीच्या घडामोडीनंतर पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या कार्यप्रणालीवर अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत त्यातूनच पालक मंत्रिपदही दत्ता मामा भरणे यांची धोक्यात आल्याची चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments