बॉलिवूडचा किंग खानच्या "सुहाना"ला चक्क या चाहत्यांनी घातली लग्नांची मागणी....


बॉलिवूडचा किंग खान अर्थातचं अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. सुहाना २१ वर्षांची होताचं तिला एका व्यक्तीने लग्नाची मागणी घातली आहे. त्या व्यक्तीने गौरी खानकडे सुहानासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

दरम्यान, सुहानाने तिचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. सोशल मीडियावर तिला अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण एका चाहत्याने तर तिला थेट लग्नासाठी विचारलं. गौरी खानने सुहानाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत लेकीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 

तेव्हा ट्विटरवर एका युझरने  कमेन्टमध्ये लिहिलं की, 'गौरी मॅम माझं लग्न सुहानासोबत करून द्या. मी महिन्याला १ लाख रूपयांपेक्षा जास्त पैसे कमवतो.' गौरी खानने शेअर केलेल्या पोस्टवर युझरने केलेली कमेन्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 

Post a Comment

0 Comments