अवघ्या पंचवीस वर्षे युपीएससी उत्तीर्ण झालेल्या तरुणाची कोरोना विरुद्ध झुंज अपयशी ; प्रांजलचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न अधूरे राहिले


अकोला: पातुर तालुक्यातील तांदळी येथील प्रांजल प्रभाकर नाकट या यूपीएससी परीक्षा पास झालेल्या २५ वर्षीय तरुणाची आठवडाभरापासून सुरू असलेली कोरोनाविरुद्धची झूंज अखेर अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री११:१५ मिनिटांनी हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.प्रांजलचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न अधूरे राहिले.

पातुर तालुक्यातील तांदळी गावच्या प्रांजल ने जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि कठोर परिश्रमातून यूपीएससी ही परीक्षा पास केली; मात्र गत आठवड्यात प्रांजल ला कोरोनाने गाठले. अकोल्याच्या खाजगी इस्पितळात दाखल केल्यानंतर प्रांजल ची तब्येत अत्यंत गंभीर झाली त्यामुळे प्रांजल चे फुफ्फुस अतिशय नाजूक अवस्थेत होते जीवन मिळण्याची आशा धूसर होत असताना कृष्णा भाऊ अंधारे तथा आप्तस्वकीयांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून अकोल्याच्या डॉक्टर सतीश गुप्ता यांच्या मदतीने हैदराबादच्या माणसाच्या फुफ्फुस वर काम करणाऱ्या यशोदा हॉस्पिटल चा शोध घेतला आणि संपर्क साधला.

सर्वप्रकारची पूर्वतयारी करून हैदराबादच्या पाच डॉक्टरांसह ॲम्बुलन्स द्वारे अवघ्या एका तासामध्ये हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आलं तेथे डॉ. जिंदाल आणि चमुने प्रांजल वर उपचार केले. बेशुद्ध असलेल्या प्रांजलने बुधवारी डोळे उघडले होते. बाबा आणि दोन्ही काकासोबत प्रांजल ने संवाद साधला.त्याच्या काकांनी लवकरच बरं होउन घरी जाऊ असं सांगितलं.त्याची तब्येत धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु शुक्रवारी दुपारनंतर गुंतागुंत वाढली आणि यातच प्रांजलचा मृत्यू झाला. मोहता मिल च्या स्मशानभूमीत त्यांच्या वर मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments