"जयसिंगपूरात पोलीसरुपी कोरोना योध्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेने पत्रकाररुपी कोरोना योद्ध्यांना दिले सनीटायझर व मास्कचे वाटप; सुरक्षित वार्तांकन करण्याचे केले आव्हान : पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने जयसिंगपूरातील सर्व पत्रकार बंधूंना सनीटायझर व मास्कचे वाटप करून पोलिसांमधील संवेदनशीलतेचे दर्शन झाले.
    
सुरुवातीस या उपक्रमाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट  करताना ते म्हणाले की, आपण दोघेही म्हणजे पोलिस व पत्रकार बंधू सातत्याने व अहोरात्र पणे कधी कर्तव्याचा भाग म्हणून तर कधी सामाजिक जाणिवेतून कार्य करीत आहोत. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने आपल्या काळजीपोटी व सुरक्षिततेसाठी म्हणून  सैनीटायझर व मास्कचे वाटप करता यावी व कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी चर्चा व्हावी म्हणून आयोजनाचा हेतू होता.       
      

उपस्थित पत्रकारांना सैनीटायझर व मास्कचे वाटप  करून गौरविण्यात आले. त्यानंतर पत्रकार मनोज पोटे यांनी पोलीस ठाण्याच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक  करून कोविड - १९ च्या भयावह संकटाच्या काळात एकमेकांच्या साथीने जेवढं उत्तम कार्य करणे शक्य आहे तेवढं समाजासाठी करूया अशा स्वरूपाचे संवेदनशील मनोगत व्यक्त केले.
        
जयसिंगपूर पोलीस ठाण्याचा हा अनोखा उपक्रम  लक्षात ठेवण्यासारखे होता,तो म्हणजे पोलीसरुपी कोरोना योध्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेने पत्रकाररुपी कोरोना योद्ध्यांना  सनीटायझर व मास्कचे वाटप करीत दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी अत्यंत काळजीपोटी सुरक्षितपणे वार्तांकन करण्याचे आव्हान केले आहे.
        
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अजित मांगुरकर,अजित पवार राजू मांजरडेकर, गणेश शिंदे, संदीप बावचे, मनोज पोटे, संतोष बामणे, संजय सुतार,सुभाष सामंत, नामदेव भोसले, हुसेन शेख,अतुल भोजणे, इकबाल इनामदार, राजू सय्यद, रतन शिकलगार, रोहित जाधव,ओंकार रेणुके,प्रा.डॉ. प्रभाकर माने आदि पत्रकार बंधू उपस्थित होते.     
     
या अगोदर ही जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या कुशल नेतृत्वाखाली जयसिंगपूर शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये गरजू व गरीब घटकांना  मास्कचे वाटप, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व प्रबोधन करून सातत्याने या कोरोना महामारी च्या काळात दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
      

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस अधिकारी  व कर्मचारी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे उत्साही आभार प्रदर्शन PSI प्रमोद वाघ यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी PSI अजित पाटील उपस्थित होते. पत्रकार प्रा.डॉ.प्रभाकर माने यांनी उत्तम सुत्रसंचालन केले. या अनोख्या व उत्साह निर्माण करणाऱ्या उपक्रमाचं सर्वत्र मनोभावे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments