भूम/प्रतिनिधी:
दि १६ मे २०२१ रोजी प्राप्त पत्रानुसार भूम-परंडा-वाशी चे माजी आमदार राहुल भैय्या मोटे यांच्या सुविद्य पत्नी तथा यशस्विनी सामाजिक अभियानाच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक सौ वैशालीताई राहुल मोटे यांची गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व (लिंग निवड प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित २००३ अंतर्गत राज्य पर्यवेक्षीय मंडळाच्या सदस्य पदी निवड करण्यात आली.
सदर मंडळाचे अध्यक्ष म्हणून माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई राजेशजी टोपे, तर उपाध्यक्ष म्हणून आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आणि शासकीय पदसिद्ध सदस्य म्हणून प्रधान सचिव,नगर विकास मंत्रालय मुंबई, प्रधान सचिव, विधी व न्याय मंत्रालय मुंबई,सचिव, महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई, सचिव,- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई, सचिव, वैद्यकीय शिक्षण,आयुक्त आरोग्य सेवा अभियान संचालक मुंबई,तर सदस्य म्हणून आमदार प्रणितीताई शिंदे सोलापूर,आमदार श्रीमती मनिषाताई कायंदे मुंबई, आमदार श्रीमती सरोज अहिरे नाशिक,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैशालीताई राहुल मोटे यांची निवड करण्यात आली आहे, त्यांच्या निवडीबद्दल भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातून अभिनंदन होत आहे.
0 Comments