आमदार प्रणिती शिंदे यांनी गरजूसाठी स्वतःच्या घरी बनवल्या पोळ्या


सोलापूर/प्रतिनिधी:

" मदतीचा एक घास " हया उपक्रमा चा शुभारंभ आज महिला काँग्रेस प्रभारी आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी स्वतः च्या घरी पोळ्या आणि भाजी बनवून हया उपक्रमाची सुरवात केली, एक आई, एक बहीण, एक गृहिणी ,आणि अन्नपूर्णा चा वसा कांग्रेस च्या महिला आणि नेत्या पूर्ण करु शकतात हे आज त्यांनी दाखवून दिले.

 "मदतीचा एक घास "  महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कडून राबवण्यात येणाऱ्या हया  उपक्रमा द्वारे आता गरजू लोकांना मिळणार  आहे घरचे जेवण, आपण घरात ज्या पोळ्या करतो त्यात रोज १० पोळ्या जास्त करायच्या आणि पाव भर भाजी जास्त करायची , आशा ४० ते ५० पदाधिकारी महिलांनी पोळ्या आणि भाजी जमा केल्या तर रोजच्या ४०० ते ५०० पोळ्या होतील हया आम्ही  एखाद्या संस्थे ला किंवा महिला आघाडी च्या बैनर खाली लोकांना देणार आहोत.

Post a Comment

0 Comments