कोरोना काळात राजस्थानात राजकीय उलथापालथ; सचिन पायलट गटाकडून जोरदार काँग्रेसला धक्का


जयपूर : सचिन पायलट गोटातील अत्यंत महत्त्वाचे नेते आणि माजी मंत्री हेमाराम चौधरी यांनी आपला आमदारकीचा राजीनामा सोपवलाय. बाडमेरच्या गुडालामानी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हेमाराम चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सादर केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते हेमाराम चौधरी यांची आपल्याच पक्षात दीर्घकाळापासून घुसमट होत होती. ते आपल्याच पक्षावर नाराज असल्याचीही चर्चा होती.

 हेमाराम चौधरी यांच्या राजीनाम्याच्या बातमीनं राजस्थानच्या राजकीय पारा पुन्हा एकदा चढल्याचं दिसून येतंय. चौधरींच्या राजीनाम्यामागचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

याअगोदरही गेहलोत सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेले हेमाराम चौधरी चर्चेत आले होते. अनेकदा त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्तही केली होती. गेहलोत सरकार विकासकामांत भेदभाव करत असल्याचा आरोपही चौधरी यांनी केला होता. विधानसभेत बोलताना चौधरी यांनी आपल्या मनातलं दु:ख बोलून दाखवलं होतं. जर शत्रुत्व असेल तर ते माझ्याशी, माझ्या मतदारसंघातील जनतेला त्रास देऊ नका, असं वक्तव्यही चौधरी यांनी भर विधानसभेत केलं होतं.

Post a Comment

0 Comments