उजनी बचाव समितीकडून सोलापूर सातारा रोडवर टायर पेटवून राज्य सरकारचा निषेध


पंढरपूर/प्रतिनिधी:

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केलेल्याचा अध्यादेश लवकर काढावा. या मागण्यासाठी उजनी धरण बचाव समितीकडून पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे सोलापूर सातारा रस्त्यावर टायर पेटवून आंदोलनाची ठिणगी टाकण्यात आली. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील, भाजप राज्य शेतकरी मोर्चा सचिव माऊली हळणवर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी उजनीचे पाणी सोलापूरच्या हक्काचे राज्य सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला.


उजनी संघर्ष समितीकडून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्याल पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याची घोषणा पाच दिवसापुर्वी केली. मात्र अद्यापही राज्य सरकारकडून त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे उजनी धरण पाणी बचव संघर्ष समितीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहीनिशी लवकरात लवकर हा आदेश काढावा अशी मागणी केली आहे. समितीच्या सदस्यांकडून रविवारी पत्रकार परिषदेत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. पंढरपूर तालुक्यातील उपरी गावातून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली

उपरी गावात सोलापूर सातारा रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उजनी जलाशयातून पाच टीएमसी पाणी दिलेला आदेश रद्द करावा. त्यासंदर्भात अध्यादेश लवकर काढावा या मागणीसाठी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या सदस्याकडून उपरी गावात सोलापूर सातारा रोडवरती टायर पेटवून आंदोलन केले. त्यावेळी सदस्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्या.

Post a Comment

0 Comments