राज्यातील लॉकडाऊन उठवणार नाही, टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येईल - राजेश टोपे



 मुंबई : गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तर, रिकव्हरी रेट वाढला आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठणार का? यासंदर्भात अनेक चर्चना उधाण आले असतानाच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन संदर्भात एक महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊन काढण्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.

लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येईल मात्र यामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्या येईल, असा निर्णय झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये महाराष्ट्रात लॉकडाउन उठण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचा दर अधिक आहे. त्यामुळे राज्यात सरसकट लॉकडाउन हटवण शक्य नाही. काही ठिकाणी शिथिलता देण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्यांचा दुसरा डोस घ्यायचा राहिला आहे, त्यांनी तो घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


Post a Comment

0 Comments