करुणा मुंडे फेसबुक पोस्टमुळे खळबळ: प्रेम कथा असणार आहे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे आणि करुणा धनंजय मुंडे…


अधुरी एक प्रेम कहानी…ही मालिका सर्वांनाच माहित असेल. प्रेक्षकांनी देखील या मालिकेला डोक्यावर घेतले होते. मात्र आता अशीच एक प्रेम कथा पुस्तक रुपात तुमच्या समोर येणार आहे. पण या प्रेम कथेवरचे पुस्तक थोडे रंजक असणार आहे…कारण ही प्रेम कथा असणार आहे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे आणि करुणा धनंजय मुंडे…काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या लव्ह ट्रँगलने राज्यात एकच खळबळ उडाली असताना करुणा धनंजय मुंडे पुस्तकात नेमकं काय मांडणार आहेत याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे.

काय आहे करुणा मुंडे यांची फेसबुक पोस्ट?
माझ्या जीवनावर आधारीत सत्य प्रेम जीवनगाथा लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर असून, त्याचे प्रकाशन लवकरच केले जाणार असल्याचे करुणा धनंंजय मुंडे यांंनी आपल्या फेसबुक पेजवर म्हटले आहे. दरम्यान जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी पुराव्यासह मांडेन, असा इशारा करुणा धनंजय मुंडे यांनी दिला होता. त्यामुळे त्या आता या पुस्तकातून काय गौप्यस्फोट करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

धनुभाऊंनी फेसबुकवर नात्याची दिलेली कबुली!
धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा यांनी बलात्कारासारख्या गंभीर आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका मांडली होती. करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत असे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पेजमध्ये म्हटले होते.


करुणा धनंजय मुंडेंना व्हायचंय आमदार!
विशेष म्हणजे या सर्व प्रकरणानंतर करुणा मुंडे यांनी कचरा प्रश्नी आणि स्वच्छता गृह या विषयी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली होती. तसेच यावेळी त्यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येणार, असे सांगितले होते. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे, असे देखील त्या म्हणाल्या होत्या.

Post a Comment

0 Comments