एका तरूणाने तृतीयपंथीयाकडे लैंगिक संबंधांची मागणी केली असल्यामुळे, त्याची हत्या करण्यात आली आहे. ही घटना मुंबईतील गोवंडी भागातील बैंगनवाडी या भागात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली असून, त्यातील ४ आरोपी हे एकाच घरातील असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मृत व्यक्तीचे नाव सुहेल अहमद शाह वय ३६ होतं. सुहेलने कायनाथ नावाच्या एका तृतीयपंथ्याला फोन करून बोलावून घेतलं होतं. त्यानंतर दारूच्या नशेमध्ये सुहेलने कायनाथला लैंगिक संबंध ठेवण्याबाबत मागणी केली. हे ऐकून कायनाथने त्याची मैत्रीण शहनाज, तिचा नवरा इरफान, त्यांची मुलगी आफ्रीन, मुलगा अवेश आणि इतर दोन नातेवाईक आशू यांना त्या ठिकाणी बोलावले.
त्या ठिकाणी आल्यानंतर, त्या सगळ्यांनी सुहेलला मारहाण करण्यास सुरूवात केली. एका आरोपीने तर सुहेलच्या पोटात चाकूने वार केले. त्यानंतर पोलिसांना या सगळ्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सुहेल त्यांना जखमी अवस्थेत सापडला. त्यानंतर त्याला रूग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतू उपचारादरम्यानच सुहेलचा मृत्यू झाला.
0 Comments