जिल्ह्यात लसींचा तुटवडा, पानगाव उपकेंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच-लांब रांगा

पानगाव/प्रतिनिधी:

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा साठा संपला आहे. अनेक लसिकरण केंद्रांवर लस उपलब्ध नाही. आणि ज्याठिकाणी लस उपलब्ध आहे त्या ठिकाणी नागरिकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे. प्रशासनातर्फे ४५ वर्षांवरील सर्वाना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण खरी परिस्थिती बघितली तर जिल्ह्यात लसींचा पुरेसा साठाच उपलब्ध नाहीये. लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. एका लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर तिथे सांगण्यात येते की लसींचा साठा संपलेला आहे. त्यामुळे नागरीक दुसऱ्या केंद्रावर जातात तिथेही तेच सांगितल जात. आणि जिकडे उपलब्ध आहे तिकडे फक्त मोजकेच लस शिल्लक आहे. तुम्ही नंतर या अस नागरिकांना सांगण्यात येत आहे. यामुळे लसीकरणासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची एकीकडून दुसरीकडे पळापळ होताना दिसत आहे. 

१ में पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. मात्र आजची परिस्थिती पाहता ते इतक्या सहज शक्य आहे का ? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

Post a Comment

0 Comments