मध्यप्रदेशचे माजी वनमंत्री आणि गंधवानीचे काँग्रेस आमदार उमंग सिंघार त्यांची प्रेयसी सोनिया भारद्वाज यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. सिंघार यांची प्रेयसी सोनिया भारद्वाजने रविवारी आत्महत्या केली, प्रसंगी सुसाईड नोटही मिळाली आहे. अंबाला येथील रहिवासी सोनिया भारद्वाजने रविवारी भोपाळच्या बंगल्यात आत्महत्या केली. तेथून सुसाईड नोटही सापडली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार उमंग सिंघार यांच्यावर अटकेची तलवार लटकली आहे. एएसपी राजेशसिंग भदोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंघारविरोधात कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासात आलं समोर…
सोनिया भारद्वाज आणि आमदार सिंघार हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचं, तपासात समोर आलं आहे. त्यांची ओळख एका मॅट्रिमोनिअल वेबसाईटद्वारे झाली होती. त्यानंतर ते लग्न नेमकं कधी करणार, हे ठरलं नव्हतं. सोनियानं आपल्या पहिल्या पतीला सोडल्यानंतर दुसरं लग्न केलं होतं. पण तेही फार काळ टिकलं नाही, असं नातेवाईकांनी सांगितलं आहे.
घटनास्थळी पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये सोनिया यांनी वाचणाऱ्याला काही इशारे मिळावेत या हेतूने सुसाईड नोट लिहिली आहे. मात्र कोणालाही थेट जबाबदार ठरवलेलं नाही. त्यामुळं पोलिस नेमकं कारण काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं सोनियाच्या कुटुंबीयांच्या जबाबावर आता पुढील तपास पोलीस करत राहतील. सोनिया भारद्वाजचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तिचा 18 वर्षाचा मुलगा आर्यन आणि आई सोमवारी आले असता, यावेळी आमदार सिंघारही याठिकाणी पोहोचले होते. यावेळी त्यांनी सोनियाच्या आई आणि मुलाशीही चर्चा केली, मग सोनिया यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. पोलिसांनी सोनिया यांच्या आईला सुसाईड नोट दाखवत त्याचसोबतच हँडरायटिंग एक्सपर्टची मदतही घेतली जात आहे. याप्रकरणी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी लवकरच सर्वकाही स्पष्ट होईल असं म्हटलं आहे.
सोनियांबद्दल नातेवाईकांनी म्हटलं आहे की..
त्यांची स्वप्नं मोठी होती. त्यांचा जीवनामध्ये संघर्ष चालू होता, त्या कधीही स्वतःच्या जीवनात समाधानी नव्हत्या. पहिल्या पतीला सोडून त्यांनी दुसरं लग्न केलं, पण तेही काही दिवसांत मोडलं होतं. अंबालाच्या बलदेव नगर परिसरात त्या आईबरोबर राहत होत्या. पण मुलावर त्यांचं खूप प्रेम होतं. तो शिमल्यात सोनिया यांचा मुलगा आर्यन हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. सोनिया त्याच्या शिक्षणाचा भार उचलत होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार..
सोनिया आणि आमदार सिंघार २ वर्षांपासून संपर्कात होते. सिंघार अंबालाला गेल्याची माहिती मिळालेली नाही. पण सोनिया दोन वेळा अंबालाला आल्या होत्या. एका महिन्यापासून त्या भोपाळमध्ये त्यांच्याच बंगल्यावर थांबलेल्या होत्या. याप्रकरणी पोलिस सध्या सिंघार यांची चौकशी करत आहेत. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिस सिंघार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकतात. त्यासाठी कुटुंबीयांचा जबाब महत्त्वाचा असणार आहे.
0 Comments