फोटोग्राफरने लग्नात ओळख वाढवून, नंतर मैत्री व कालांतराने प्रेमाचे नाटक अन् ठेवले शारीरिक संबंध, पोलिस तक्रार दाखल


औरंगाबाद : चुलत भावाच्या लग्नात काढलेले फोटो देण्याच्या बहाण्याने मैत्री केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरीक संबंध ठेवल्याची घटना औरंगाबादेतून समोर आली आहे. या प्रकरणी तरुणाने लग्नास नकार दिल्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दिली. 

लग्नाच्या आमिषाने ठेवले शारीरीक संबंध
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश मुरलीधर साळवे असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वडील मुरलीधर, आई आणि भावांचा देखील आरोपींमध्ये समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी तक्रारदार पीडितेच्या चुलत भावाचे बीड बायपास येथे लग्न होते. त्या लग्नात फोटोग्राफीचे काम आकाश साळवेकडे होते. 

आकाशने लग्नातील नातेवाइकांकडून पीडितेचा मोबाइल क्रमांक मिळवून तिच्याशी संपर्क साधून तिचे लग्नात काढलेले फोटो पाठवले. या बहाण्याने ओळख वाढवून, नंतर मैत्री व कालांतराने प्रेमाचे नाटक केले. प्रेम प्रकरणाबद्दल दोन्हीकडील कुटुंबांनादेखील सांगण्यात आले. मात्र, त्याने अचानक लग्न करण्यास नकार देत पीडितेला मारहाण केली. यानंतर पीडितेने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक मीरा लाड तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments