महाराष्ट्रातील 'या' चार जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन जाहीर


राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आता स्थानिक प्रशासनाकडून  जिल्हा पातळीवर लॉकडाऊन करण्यात येत आहे. सोलापूर , अमरावती नंतर आता वाशिम आणि अकोल्यातही कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

वाशिममध्ये सात दिवसांचा कडक लॉकडाऊन

वाशिम जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ९ ते १५ मे असा ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला, किराणा, डेअरी, फळविक्री ही अत्यावश्यक सेवेची दुकाने बंद राहणार आहेत. तर केवळ ७ ते ११ या काळात होम डिलिव्हरी  सुरू राहणार आहे. बँकांच्या अत्यावश्यक कामासाठी १० ते २ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी  काढले आहेत.


अकोल्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन

अकोला जिल्ह्याकरिता रविवार दिनांक ९ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शनिवार दिनांक १५ मेच्या रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. हे आदेश १५ मे रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहतील.

लॉकडाऊन संदर्भातील महत्वाच्या बाबी

कोणत्‍याही व्‍यक्‍तीस अत्‍यावश्‍यक व वैद्यकीय  कारणाशिवाय घराबाहेर पडण्‍यास पुर्णत: बंदी राहील.सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी इत्‍यादी दुकाने तसेच खादयपदार्थांची इतर सर्व दुकाने (कोंबडी मटन पोल्‍ट्री मासे व अंडी यासह) सर्व मद्यगृहे, मद्यदुकाने व बार ही दुकाने पुर्ण पणे बंद राहतील. तथापी, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत सुरू करण्‍यास परवानगी राहील.

कोणत्‍याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्‍वत: जावून खरेदी करता येणार नाही.हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी याची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यत सुरु राहील.कोणत्‍याही परिस्थितीत ग्राहकास हॉटेल,  रेस्‍टारंट,  खानावळ, शिवभोजन थाळी येथे स्‍वत: जावून पार्सल घेता येणार नाही.

Post a Comment

0 Comments