"महा विकासआघाडीवर जनतेचा रोष" पंढरपूर मधील विजयानंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया


सोलापूर/प्रतिनिधी:

पंढरपूरमध्ये झालेल्या भाजपच्या समाधान आवताडे यांच्या विजयानंतर राज्य पातळीवरून भाजपची पहिली प्रतिक्रिया आली आहे.ती म्हणजे पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीवर तेथील मतदारांनी या निमित्ताने रोष व्यक्त केला आहे.भालके यांना सहानुभूती मिळाली म्हणून त्यांना एवढी तरी मते मिळाली दुसरीकडे निवडणूक असती तर भाजपने वन वे विजय मिळवला असता,असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

अशी प्रतिक्रिया त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. पाटील पुढे म्हणाले की, भालके यांच्या बाजूने सहानुभूती होती मात्र महा विकासआघाडीवर मतदारांचा रोष होता हे वास्तव आहे. न मिळणारा पिक विमा, कोरोनातील निष्काळजीपणा, वाढीव वीज बिले यामुळे सरकारवर मतदारांचा रोष होता तो इथे खऱ्या अर्थाने व्यक्त झाला आहे, असेही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments