महाराष्ट्र विद्यालय,बार्शी येथे प्राचार्य,शिक्षक व वरिष्ठ लिपिक यांचा सेवावृत्तीचा कार्यक्रम संपन्न


बार्शी/प्रतिनिधी:

आज दि ३१ मे २०२१ रोजी प्राचार्य डी.बी.पाटील तसेच विद्यालयातील सहशिक्षक आर.एस.जाधव व वरिष्ठ लिपिक टी.एस.मोरे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

यावेळी सर्व सत्कार मूर्तींचा सत्कार बार्शीचे ग्रामदेवत श्री भगवंतांची प्रतिमा,शाल, जगदाळे मामांच्या जीवनावर आधारित पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सत्कार मूर्तीचे सत्कार पुढील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री.शि.शि.प्र.मंडळाचे जनरल सेक्रेटरी व्ही.एस.पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे व संस्था सदस्य अरुण देबडवार 
यावेळी उपप्राचार्य एल.डी.काळे , पर्यवेक्षक जी.ए.चव्हाण, किमान कौशल्य विभाग प्रमुख एस.एन. भंडारी, अतुल नलगे, शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी कोविड-१९ चे नियम पाळून उपस्थित होते. तसेच राहिलेल्या सर्व शिक्षकांनी ऑनलाईन उपस्थित दाखविली.
 
या कार्यक्रमामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या वतीने  आर.बी. गोणेकर(क.म.शिक्षक) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एल.डी.काळे यांनी केले. सत्कार मूर्तींचा परिचय किरण गाढवे यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम देशमुख  यांनी तर आभार प्रदर्शन एस.एल.देशमुख यांनी केले.

Post a Comment

0 Comments