...अखेर वैराग शहर नगरपंचायत झाले


वैराग/प्रतिनिधी:

कोणतीही नगरपंचायत होणे कामी शासकीय पातळीवर प्रशासनाकडून प्रस्ताव सादर केला जातो.
वैराग शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व नागरिक यांची वैराग नगरपंचायत व्हावी अशी मागणी होती, कारण वैराग हे पूर्वीचे गाव न राहता विस्तारित भाग वाढत जाऊन उपनगरे तयार होऊन मोठ्या शहराकडे वाटचाल सुरू झाली होती, त्यामुळे भविष्यात आपले गाव ग्रामपंचायत न राहता नगरपंचायत होणे आवश्यक होते.

सर्व नागरिक व लोकप्रतिनिधी यांचे मागणीवरून स्थानिक पातळीवरून जेंव्हा वैराग नगरपंचायत बाबत अंतिम प्रस्ताव डिसेंबर-२०२०अखेर महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आला. 

गेल्या अनेक वर्षाची संपुष्टात येऊन वैराग ग्रामपंचायत चे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली, मंत्रालयात या सूचनेची प्रत मुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक नेते निरंजन भूमकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, करमाळा आमदार संजय शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत शिंदे, माजी आमदार दिपक सांळुके, कल्याण काळे, उमेश पाटील व उत्तमराव जानकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments