"कित्येक वर्षांपासून शेतीचे भिजत घोंगडे सामोपचाराने मिटवले; माजी सरपंचाने केला सत्कार"


सिरसाव/प्रतिनिधी:

आजपर्यंत आपण बघत आलो आहे की शेतीच्या वादासाठी कोर्ट, कचेरी, पोलीस स्टेशन चकरा मारता मारता पिढ्यानपिढ्या वाया घालवताना दिसतं आहेत. त्यात पैसाच  अपव्यय, वेळ, मानसिक त्रास सहन करावा लागतो, वेळप्रसंगी वाद हि बघायला मिळतात, असेही माणसं आढळत आहेत की वाद सामोपचाराने मिटवत असताना दिसतं आहेत.

तशीच घटना सिरसाव मध्ये बघायला मिळाली, जोतिराम पाटील व आबासाहेब मिसाळ यांनी खाजगी मोजणीद्वारे आपआपली शेती मोजली, कित्येक वर्षांपासून कसत असलेल्या पण जे थोड्या क्षेत्रा वरील ताबा श्री. आबासाहेब मिसाळ यांनी सोडून दिला. गावातील शेतीचा तंटा गावातच मिटल्यामुळे जोतिराम पाटील यांनी केदार आबासाहेब मिसाळ यांच्या घरी जाऊन सत्कार केला, पाटील कुटुंबाच्या वतीने मिसाळ परिवार यांचे आभार मानले.

जोतिराम पाटील यांनी महालक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून आज पर्यंत सिरसाव मध्ये अनेक विधायक कार्यक्रम घेतले आहेत, भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान असो व समाजासाठी इतर कामे नक्कीचं प्रेरणादायी ठरत आहेत. 

"शेती व गावांतील तंटे गावातच मिटवले तर गावाच्या विकासासाठी नक्कीच दिशादर्शक ठरतील" - संजय पवार, नेते राष्ट्रवादी काँग्रेस

Post a Comment

0 Comments