दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत फिरायला गेला म्हणून तरुणाला बेदम मारहाण


बंगळुरूमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत फिरायला गेला म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात बजरंग दलाचे चार कार्यकर्तेही सामील आहेत. 

मारहाण करणाऱ्या आरोपींनी १ एप्रिलला रात्री साडेनऊ वाजता बस रोखली. बसमध्ये प्रवास करणारा संबंधित मुलगा आणि मुलीला बसखाली उतरवलं. त्यानंतर तरुणाला प्रचंड मारहाण केली. मुलगा-मुलगी हे दोघं एकाच वर्गात शिकले. ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पण त्यांचा धर्म वेगळा आहे. त्यावरुन आरोपी नराधमांनी तरुणाला प्रचंड मारहाण केली.

 तरुणी ही बंगळुरुला जात होती. तिच्यासोबत फिरणाऱ्या तरुणाला बंगळुरुविषयी चांगली माहिती होती. याशिवाय मुलगी कित्येक वर्षांपासून त्याला ओळखते. तो मुलीला मदतच करत होता, असं तिचं म्हणणं आहे. मात्र, हे दोघंही जण एका बसने प्रवास करत होते हे त्या नराधमांना कसं कळलं, त्यांनी त्या तरुणाला नेमकं का मारहाण केली. त्यामागे आणखी काही वेगळं कारण आहे का? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments