सोमनाथ राजेंद्र लोहार आणि यश दत्ताकाका साने यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना दिलासा

पुुणे;

कोरोणा संक्रमणाच्या काळामध्ये सर्व स्तरातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती कमालीची ढासळलेली असताना देखील विविध महाविद्यालये विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्क भरण्यासंबधी तगादा लावत असल्या कारणाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवड भागांमधील सर्व महाविद्यालयांना निवेदन देऊन विद्यार्थी प्रश्नांचे निराकरण करण्याची सुरवात केली.
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेश तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्या सोमनाथ राजेंद्र लोहार (प्रदेश सचिव:राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस,व्यवस्थापन) यांच्या उपस्थितीत द्वारे यश दत्ताकाका साने (अध्यक्ष: राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर) तसेच विविध राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे पदाधिकारी यांच्या तर्फे पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. डी वाय पाटील, आर्टस् कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाताल व्यवस्थापन समितीशी चर्चा करून निवेदन देण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकार्यांना देखील सकारात्मकता दर्शवत सकारात्मक निर्णय घेऊन यापुढे एकाही विद्यार्थ्याला तशी सक्ती किंवा तगादा लावला जाणार नाही अशे आश्वासन देण्यात आले. हा निर्णय ऐकून विद्यार्थी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

Post a Comment

0 Comments