वैराग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे बुद्ध पौर्णिमा साजरी....


वैराग/प्रतिनिधी:

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैराग शहरच्या वतीने वैराग येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात, शहर शाखेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बार्शी तालुका नेते निरंजन भुमकर, जिल्हा राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा शलाका मरोड-पाटील, नितीन पाटील, तालुकाध्यक्ष राजकुमार पौळ, राष्ट्रवादी अल्पसंख्याक वैराग अध्यक्ष बाबा शेख, राष्ट्रवादी युवक वैराग शहर अध्यक्ष शिवम थोरात, सतिश सुरवसे, बाळासाहेब भुमकर, फारुख शेख, हरिश्चंद्र देवकर, शिवाजी हाजारे या वेळी उपस्थित होते. 
मान्यवरांनी तथागत गौतम बुद्धांच्या कार्यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष मौलाना अब्बास शेख यांनी भुषविले. बुध्द पौर्णिमेच्या निमित्ताने वैराग येथील संतनाथ कोविड सेंटरमध्ये रुग्णांना खीर देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन वैराग शहर अध्यक्ष दलितमित्र प्रशांत भालशंकर सर यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments