राज्यांतील "या" ओबीसी मंत्र्याना व्हिडीओद्वारे जीवे मारण्याची धमकी, खळबळजनक खुलासा…


 OBC आरक्षणाच्या मुद्यावरून वाद पेटला आहे. अशातच आरक्षणासाठी लढणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.  मोबाईलवर व्हिडीओ पाठवून धमकी देत असल्याचा धक्कादायक खुलासा वडेट्टीवार यांनी केला आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने  रद्द केले आहे. या मुद्यावर बोलत असताना विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी ओबीसी आरक्षणासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकी देत असल्याची माहिती त्यांनी दिली.

‘काही जण ओबीसी आरक्षणासाठी लढा देणाऱ्या नेत्यांना धमकी देत आहे. कोल्हापूरचे पाटील आहे, त्यांनी मारण्याची धमकी दिली आहे. मला, छगन भुजबळ, यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांना फेसबुकवर व्हिडीओ  टाकून टॅग केलं जात आहे, तुम्हाला आम्ही मारू, ठोकून काढू अशा धमक्या देत आहे. पण, अशा धमक्यांमुळे प्रश्न थोडी सुटणार आहे, असा खुलासा वडेट्टीवार यांनी केला.

लवकरच धमकी देणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. आरक्षणाचा प्रश्न धमकीने सुटणार नाही तर चर्चेने सुटणार आहे. धमकी न देता चर्चा करून प्रश्न सोडवावा, असं आवाहन सुद्धा वडेट्टीवार यांनी केलं आहे.

तसंच, ‘मुळात मुख्य मुद्दा असा आहे की, मराठा समाजासाठी संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर जर दोन नेते एकत्र येत असतील तर स्वागताची बाब आहे. पण जर राजकीय दृष्टीने जर कुणाला फायदा होणार असेल तर दोन्ही नेत्यांनी याबद्दल सावध भूमिका घेतली पाहिजे’, असंही वडेट्टीवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments