विरफ पटेल असं त्या अभिनेत्याचं नाव आहे. त्याने सलोनी खन्नासोबत लगीनगाठ बांधली. विरफ आणि सलोनी यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. या दोघांचे लग्न मुंबईच्या वांद्रे कोर्टात झाले. ‘रबर बँडची अंगठी, उधारीची साडी, अँटीबॉडी असणारे साक्षीदार आणि केवळ १५० रुपये! असा पार पडला आमचा लग्नसोहळा’, असे सलोनीने म्हटलं.
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता विराफ पटेलने अभिनेत्री सलोनी खन्नासोबत लग्न केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विराफ आणि सलोनीने मुंबईतील वांद्रे कोर्टात लग्न केले आहे. एक बूंद इश्क आणि नामकरण मालिकेतील अभिनेता विराफ पटेलने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सलोनीसोबत साखरपुडा केला होता. दोघांची भेट दोन वर्षांपूर्वी एका ऑनलाइन शोदरम्यान झाली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांना डेट करू लागले होते.
अभिनेता विराफ म्हणाला की, आता कोरोनाचे संकट आले आहे. सर्वकाही बंद आहे. अशात आम्ही जुगाड शोधला. सर्वात चांगली बाब ही आहे की सलोनीने यासाठी मला मारले नाही. लग्नाचे वृत्त आल्यापासून दोघेही चर्चेत आहे आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलोनी खन्ना पंजाबी आहे आणि विराफ पटेल पारसी आहे.
0 Comments