मोठी बातमी! भाजपचे समाधान आवताडे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल


राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालातील पहिल्या फेरीत पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली.

त्यामध्ये, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालकेंनी आघाडी घेतली होती. मात्र, नवव्या फेरीअखेर भाजपाच्या समाधान अवताडेंनी भगिरथ भालकेंना मागे टाकले आहे.ते ३३ व्या फेरी पर्यंत समाधान आवताडे यांनी आघाडी कायम ठेवली असून ते विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना मागे टाकत समाधान आवताडे हे जवळपास २४,६५५ हजारांच्या मताधिक्य फरकाने आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

0 Comments