पंढरपूर/प्रतिनिधी:
राज्यासह सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्याची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यातच रुग्णांना उपचारासाठी विविध कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पिटल कोरोना बाधित रुग्णांमुळे दाखल करण्यात येते मात्र रुग्णांना कश्या पद्धती बेड उपलब्ध करता येईल याची माहिती नसते. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा प्राणही जात आहे. मात्र पंढरपूर येथील शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने वॉर रूम संकल्पना तयार केली आहे. त्यातुन पश्चिम महाराष्ट्रात जिल्ह्यातील रुग्णाला लागणाऱ्या बेडची उपलब्धता करून देण्यात येत आहे. मंडळात तरुण कार्यकर्त्यांकडून या संकल्पनेतून शेकडो रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध करून दिली आहे. कोरोना रुग्णांना कोरोनाच्या भीषण संकटात मदतीचा हात देत आहे.
शिवछत्रपती मंडळाची 'आमची मोहीम.. तुमची साथ'..
राज्यासह जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे संकट मोठे झाल्या आहे. त्यातच प्रशासनाकडून कठोर उपाययोजनाही करण्यात येत आहे. मात्र काही सामाजिक संघटना आपल्या परीने मदत करत आहेत. कोरोना काळात शिवछत्रपती तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन दाखवले आहे. शिवछत्रपती मंडळाकडून 'आमची मोहीम तुमची साथ' या माध्यमातून वार रूम तयार करण्यात आली. कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार व बेड उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी मंडळातील तरुणांनी पश्चिम महाराष्ट्रातील हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टरांशी संपर्क साधून त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या ऑक्सीजन बेड, ओटू बेड, बायपास बेड यांची यादी तयार केली आहे.
मंडळातील तरुण कार्यकर्त्यांकडून बेडचे व्यवस्थापन..
शिवछत्रपती मंडळातील कार्यकर्त्यांकडून पश्चिम महाराष्ट्रातील कोविड हॉस्पिटलची यादी तयार केली आहे. त्यातून हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती घेतले आहे. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून व्हाट्सअपच्या माध्यमातून ग्रुप तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातून कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांचे कॉल मंडळातील कार्यकर्त्यांना येत असतात. कार्यकर्त्यांकडून कोरोना बाधित रुग्णांची सध्याची असणारी परिस्थिती लिहून घेतली जाते. कोविड असणारी परिस्थिती पाहून संबंधित कोविड हॉस्पिटल संपर्क साधून बेड उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे रुग्णाला वेळेत बेड उपलब्ध होतो आणि त्याच्यावर योग्य ते उपचार केले जात आहेत. या उपक्रमाचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून कौतुक होत आहे.
शिवछत्रपती मंडळाचे सामाजिक बांधिलकी...
शिवछत्रपती तरुण मंडळ हे गणपती उत्सवात समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. सध्याच्या कोविड परिस्थितीतही शिवछत्रपती मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. या मंडळात सर्व तरुण कार्यकर्ते वाररूमच्या माध्यमातून दिवस-रात्र कार्यरत आहेत. कोरोना काळामध्ये शिवछत्रपती मंडळाकडून पंढरपुरातील नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. ज्या कुटुंबातील नागरिक वयोवृद आहेत. त्यांना घराबाहेर पडता येत नाही, आशा कुटुंबीयांना मंडळातील कार्यकर्त्यांकडून मदत केली जाते. कोरोना परिस्थितीमध्ये आशा तरुण मंडळांनी पुढे येण्याची गरज आहे.
0 Comments