"आयकर अधिकाऱ्याचा महिला डॉक्टरवर अत्याचार; लग्नाचं आमिष दाखवून केला धक्कादायक प्रकार"


 नागपूर येथील एक आयकर अधिकारी उपचारासाठी महिला डॉक्टरकडे आला. त्याने उपचार करणाऱ्या तरुण महिला डॉक्टरला जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार करीत शारीरिक संबंधाचे मोबाईलने फोटो आणि व्हिडीओ काढले. ती गर्भवती झाल्यानंतर तिचा बळजबरी गर्भपात केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय डॉ. प्रीती (बदलेले नाव) उत्तर नागपुरात राहते. २०१९ मध्ये सुथांदिरा हा मानकापूरमधील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होता. याच कालावधीत स्वीटी ही मानकापूरमधील एका रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी होती. प्रकृती खालावल्याने सुथांदिरा हा रुग्णालयात गेला. यादरम्यान त्याची डॉ. स्वीटीसोबत ओळख झाली. स्वीटीनेही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याची विनंती सुथांदिरा याच्याकडे केली. त्यानो प्रीतीचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली.

विवाहीत असतानाही अविवाहीत असल्याचे सुथांदिरा याने प्रीतीला सांगितले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढले. याचदरम्यान, ती गर्भवती झाली. सुथांदिराने तिला गर्भपात करायला लावला.

दरम्यान, सुथांदिरा विदेशात गेला. त्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क तोडला. मार्च महिन्यात प्रीतीने एनएडीटीची बेवसाइट तपासली. त्यात सुथांदिरा हा विवाहित असल्याचे तिला कळाले. तिने सीताबर्डी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणाची खापरखेडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुंडलिक भटकर कसून चौकशी करत आहेत.

Post a Comment

0 Comments