मुंबई : मुंबईतील आरे दुग्ध डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथु राठोड यांना लाच मागितल्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यावेळी अधिकाऱ्यांना राठोड यांच्या घरातून पैशांचे मोठे घबाड सापडले. तब्बल ३ कोटी ४० लाख रुपयांची रोकड आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नथु राठोड यांच्या घराची झडती घेतली. यावेळी त्याच्या घरातून अधिकाऱ्यांना तब्बल ३ कोटी ४० लाख रुपयांची रोकड आढळून आली. आरेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या घरात इतके मोठे घबाड आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणी एसीबीचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.
फिर्यादी यानी आरे कॉलनी, युनिट ३२ गोरेगाव मुंबई येथील आपल्या घराच्या दुरुस्तीच्या कामाची परवानगी मिळावी यासाठी नथु राठोड यांची भेट घेतली. यावेळी राठोड यांनी अरविंद तिवारी यांना भेटण्यास सांगितले. त्यावेळी अरविंद तिवारी याने नथु राठोड यांच्यावतीने फिर्यादीकडे ५०,००० रुपयांची मागणी केली आणि ती स्वीकारताना सापळा रचून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नथु राठोड आणि अरविंद तिवारी यांना रंगेहात पकडले.
नथु राठोड यांनी लाच मागितल्याप्रकरणी फिर्यादी यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे १४ मे रोजी लेखी तक्रार दिली होती. यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या माहितीची पडताळणी केली आणि त्यानंतर सापळा रचून दोन्ही आरोपींना लाच घेताना रंगेहात अटक केली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अनिनियम १९८८ कलम ७अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments