"बार्शी शहरात नूतन ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन"



बार्शी/प्रतिनिधी:

बार्शीतील डॉ.संजय अंधारे यांच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये नूतन ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

बार्शी शहरातील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये आसपासच्या ६ ते ७ तालुक्यातील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. मध्यंतरी निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवडयाच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी सुश्रुत हॉस्पिटलने स्वतःचा ऑक्सिजन प्लांट हॉस्पिटलच्या आवारात सुरू केला आहे.

याप्रसंगी मी स्वतः उपस्थित होतो,त्याचबरोबर बार्शी शहराचे  नगराध्यक्ष ॲड.असिफभाई तांबोळी, तहसीलदार सुनिल शेरखाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले, पोलिस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ढगे, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. शितल बोपलकर, डॉ.महादेव कोरसाळे, डॉ.ज्ञानेश्वर राऊत, डॉ.अजित अंधारे, अरूण दादा बारबोले, भाऊसाहेब आंधळकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments