बार्शी/प्रतिनिधी:
बार्शीकर आपला माणूस हक्काचा माणूस म्हणुन ज्यांची ओळख आहे ते मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांच्या प्रयत्नातून व डॉ. अरविंद शाह, लंडन व मुकुल जाधव फाउंडेशन द्वारा आर. सी. शाह,संगमनेर यांच्याकडून सीएसआर फंडातून कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानला नवीन दोन व्हेंटिलेटर प्रदान केले आहेत.
त्याचे वितरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता मंत्रालयात करण्यात आले.मातृभूमी प्रतिष्ठान सह आणखीन पाच विविध संस्थांना याचे वाटप करण्यात आले. मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे व संचालक अजित कुंकुलोळ यांनी ते स्विकारले.
0 Comments