मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. जॉनसन यांनी कैरी साइमंड्ससोबत खासगीपद्धतीने लग्न केल्याचं कळलं आहे. या लग्नात दोघांचे अतिशय जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार होता.
माहिती मीडिया रिपोर्टनुसार, जॉनसन आणि साइमंड्स यांनी अतिशय खासगी पद्धतीने हा सोहळा पार पाडला आहे. ३० जुलै २०२२ रोजी हे लग्न होणार असल्याची चर्चा रंगली होती. याकरता ५६ वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि त्यांची ३३ वर्षीय गर्लफ्रेंड कैरी साइमंड्स नातेवाईकांना आमंत्रण देत होते. मात्र यावर लग्नाचं स्थळ देण्यात आलं नव्हतं.
२०१९ मध्ये जॉनसन पंतप्रधान झाल्यानंतर जॉनसन आणि साइमंडस डाऊनिंग स्ट्रीटमध्ये एकत्र होते. गेल्यावर्षी त्यांना एक मुलगा झाला आहे. याआधी पंतप्रधान जॉनसन दोन वेळा लग्न झाले असून ते त्या त्या वेळी घटस्फोट घेतले आहेत.
0 Comments