प्रा.डॉ. प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एक महिन्यात जयसिंगपूर पोलीस ठाणे हे सातत्याने समाजाभिमुख कामाचा झपाटा लावून संवेदनशीलता दाखवित आहे. त्याच कामाचे विस्तारितरूप म्हणून त्यांनी जयसिंगपूर शहरातील गरीब व गरजू घटकांना वस्तू व अन्नधान्याच्या माध्यमातून योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे.
जयसिंगपूर शहराची लोकसंख्या पाहता एकूण लोकसंख्येमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक असून हे घटक अत्यंत गरीब व गरजू आहेत. जयसिंगपूर वासियांकडून अशा घटकांना सर्व स्तरातून मदत मिळत असते. या कामी जयसिंगपूर पोलीस ठाणे ही अग्रेसर असून त्यांनी विविध पातळीवर या घटकांना मदत करण्याचे काम केले आहे.
कोरोना महामारीच्या काळात उद्भवलेल्या या महाभयानक संकट प्रसंगी गरीब व गरजू कुटुंबियांचे हाल होत असताना त्यांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्यातील माणुसकीच्या मायेचा झरा फुटून दातृत्वाच्या भावनेने जयसिंगपूर शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस असणाऱ्या झोपडपट्टीत व डवरी सोसायटीमध्ये राहणाऱ्या अत्यंत गरीब व गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.
जीवनावश्यक वस्तूमध्ये गोडेतेल, साखर, चहा पावडर,खोबरेल तेल, तूर डाळ, मुगडाळ इ. वस्तू तसेच अन्नधान्याचे समावेश होता. या वस्तू व अन्नधान्याचं वाटप शासनाच्या कोरोना अधिनियमांना अनुसरून व्यवस्थित रित्या करण्यात आले आहे. त्याचबरोबर अन्नधान्य वितरणावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व त्यांच्या सहकार्यानी या गरजू लोकांचं प्रबोधन करून शासनाचे हात बळकट करण्यासाठी आवाहन ही केले.
या अन्नधान्य वितरणावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्यासमवेत त्यांचे सहकारी पोलीस नाईक सौ.खंडागळे, विजय पाटील व गोरख नाईक हे पोलीस कर्मचारी सहभागी होते.
जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या या समाजाभिमुख दातृत्वाच्या कार्याचा कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे.
0 Comments