लसीकरणाबाबत सावळा गोंधळ, पंढरपूर येथील दोन्ही लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगाच रांगापंढरपूर/प्रतिनिधी:

राज्यासह जिल्ह्यामध्ये वाढणारी कोरोनाची साखळी हा चिंतेचा विषय ठरत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून लसीकरणावर जोर दिला जात आहे. जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र पंढरपूर नगर परिषदेकडे जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी पंढरपूर नगर परिषदेकडे ५०० कॉविडशील वॅक्सिंगचे उपलब्ध करून देण्यात आली. आज लसीकरण व्हावी म्हणून ४५ वर्षवरील नागरिकांनी एकच गर्दी केली. नागरिकांनी पहाटे पासून लांबच लांब रांगा लावल्या होत्या. यामुळे प्रशासनाची व पोलिसांची एकच धावपळ उडाली..

पंढरपुरातील दोन्ही लसीकरण केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी..

पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे.तसेच जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात संचार बंदी असतानाही ४५ वर्षवरील नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. पंढरपूर येथील लोकमान्य विद्यालय व कराड नाका येथील आरोग्यवर्धिनी केंद्रावर प्रत्येकी अडीशे लस उपलब्ध करण्यात आली. लसीकरण करण्यात येणार असल्याने नागरिकांनी पहाटे पाच वाजल्यापासून मोठी गर्दी केली होती. नागरिकांकडून कोणत्याही प्रकारच्या कोरोना नियमांचे पालन केले जात नव्हते. मात्र प्रशासन वेळेत हस्तपेक्ष केल्यामुळे गर्दी कमी करण्यात यश आले.

पंढरपूर नगरपरिषदेचा लसीकरणाबाबत सावळागोंधळ..

पंढरपूर नगर परिषदेकडून सोमवारी नागरिकांना आवाहन करण्यात आले की मंगळवारी पंढरपूर येथील दोन लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार आहे मात्र ४५ वर्षावरील नागरिकांना पहिला किंवाा दुसरा याबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती.  त्यामुळे नागरिकांचाा पहाटेपासूनच दोन्ही लसीकरण केंद्रावर झुंबड उडाली होती. मात्र पोलीस प्रशासनाकडून वेळीच दक्षता घेतल्यामुळे दोन्ही केंद्रावरची लसीकरण आणि सुरळीत चालू झाली. प्रथम आलेल्या नागरिकांना नगर परिषदेकडून डोस देण्यात आले. या सर्वांमध्ये नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना योग्य ती माहिती न दिल्यामुळे नागरिकांचा सावळा गोंधळ उडाल्याचे दिसून आला.

Post a Comment

0 Comments