सिरसाव! प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सिरसाव येथे २५० नागरिकांना लसीकरण…


सिरसाव/प्रतिनिधी:

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सिरसाव येथे आज २५० लोकांना लसीकरण करण्यात आले, ४५ वर्षाच्या वरील ज्याने लस घेतली नाही त्यांना लसीकरण देण्यात आले. लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शासनाकडून होणाऱ्या लशीच्या अपुऱ्या पुरवठ्यअभावी नागरिकांची गैरसोय,गर्दी रोखण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने घेतला पोलिसांचा आधार पोलिसांनी प्रत्येकी १०-१० लोकांनां बोलावून रांगेत उभे करून लस घेण्यासाठी हॉस्पिटल मध्ये सोडण्यात आले.

 लसीकरण यशस्वी करण्यासाठी, वैद्यकीय अधिकारी ,नर्सिंग स्टाफ,ग्रामविकास अधिकारी,तलाठी व सिरसाव ग्रामपंचायत सर्व  सदस्य यांनी मेहनत घेतली, लशी चे फक्त २५० डोस असल्यामुळे ग्रामस्थांना नाराज होऊन परत जावे लागले, त्यांची प्रचंड नाराजी जाणवत होती,तरि उपस्थित ग्रामस्थांनी सहकार्य करून, ग्रामविकास अधिकारी,तलाठी, पोलिस व हॉस्पिटल प्रशासन ,ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामस्थांनी, सहकार्य केले,त्यामुळे होणारा गोंधळ टळला ,लस कमी असल्यामुळे नागरिकांतून नाराजी जाणवत होती,लसीचा योग्य पुरवठा करण्यात यावा.

"शासनाकडे पाठपुरावा करून येत्या काळात लस उपलब्ध करून दिली जाईल नागरिकाने घाबरून जाऊन तशी करण्यासाठी गर्दी करू नये असे आव्हान ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले."

"कोविड-१९ च्या नियमाचे पालन नागरिकांनी करावे व स्वतःला व कुटुंबियांना या महामारीपासून वाचवावे, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडले असता मास्क वापरावा जेणेकरून इतरांकडून आपल्याला संपर्क होणार नाही" - मेघराज गायकवाड, ग्रामविकास आधिकारी, सिरसाव

"येत्या काळात जास्तीत जास्त लसीच्या उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू" - रामेश्वर चोबे ग्रामपंचायत सदस्य, सिरसाव.

Post a Comment

0 Comments