भारत नैसर्गिक नव्हे, तर मोदी सरकारनिर्मित राष्ट्रीय आपत्तीकडे वळत असल्याचा मेडिकल जर्नल लँसेटमधून टीका


नवी दिल्ली : मेडिकल जर्नल लँसेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संपादकिय लेखातून मोदी सरकारने हाताळलेल्या कोरोना स्थितीवरून खरमरीत टीका करण्यात आली आहे.मोदी सरकारकडून कोरोना हटवण्यास नव्हे, तर ट्विटरवर त्यांच्याविरोधात आलेल्या टीका आणि आक्षेपार्ह कमेंट्स हटवण्याला प्राधान्य असल्याचं म्हणत ताशेरे ओढण्यात आले आहेत.

भारत नैसर्गिक नव्हे, तर मोदी सरकारनिर्मित राष्ट्रीय आपत्तीकडे वळत असल्याचा उल्लेख लँसेटकडून करण्यात आला आहे. संकटसमयी पंतप्रधान मोदी हे टीकेला आणि खुल्या चर्चेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून ही अक्षम्य बाब असल्याचा गंभीर मुद्दा या लेखातून मांडण्यात आला आहे. इंस्टीट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इवॅल्यूएशनकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजाचा उल्लेखही या संपादकिय लेखात केला आहे. जिथं स्पष्ट सांगण्यात आलं होतं, की  १ ऑगस्टपर्यंत भारतात १० लाखांहून अधिक मृत्यू होतील. 

'सुपरस्प्रेडर इवेंट्स'बाबत माहिती देऊनही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं, मोठ्या संख्येनं राजकीय मोर्चे निघाले, यामध्ये असंख्य लोक सहभागी झाले होते. तेव्हा आता गंभीर परिस्थिती दिसून आल्यास या आत्मघातकी राष्ट्रीय नुकसानासाठी सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असेल असे खडे बोल सुनावण्यात आले आहेत. 

Post a Comment

0 Comments