Oscar 2021: ऑस्कर २०२१ पुरस्कारांमध्ये ‘नोमडलँड’ची वर्णी, सर्वोत्कृष्ट सिनेमासह, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि दिग्दर्शकाचा पुरस्कार


सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९३ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा ‘नोमडलँड’सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाने तीन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. या सिनेमासाठी अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर क्लोई जाओ यांना दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर ‘नोमडलँड’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावत २०२१ सालातील ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

लॉस एन्जेलेसमध्ये हा सोहळा पार पडतोय. यावेळी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा सोहळा व्हर्चुअल पद्धतीने पर पडतोय. युनियन स्टेशन आणि डॉल्बी थिएटर इथं हा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘द प्रॉमिसिंग यंग वुमन’,  ‘द फादर’, ‘नोमेडलँड’, ‘साऊंड ऑफ मेटल’ ‘जुडास अ‍ॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या सिनेमांना वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेते अँथनी हॉपकिंस यांना ‘द फादर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर दक्षिण कोरियाच्या अभिनेत्री युन यू जंग यांना ‘मिनारी’ या सिनेमासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता डॅनियेल कालूया याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेते अँथनी हॉपकिंस
अभिनेते अँथनी हॉपकिंस यांना ‘द फादर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (नोमाडलँड)
अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडॉर्मंडने ‘नोमाडलँड’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.

सर्वोत्कृष्ट चित्रपट: ‘नोमेडलँड’ ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट सिनेमा
‘नोमेडलँड’ या सिनेमाने २०२१ च्या सर्वोत्कृष्ट पुरस्कारावर नाव कोरलं आहे. नोकरी गेल्यानंतर घराबाहेर पडून फिरायला निघालेल्या एका महिलेची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिने या सिनेमात या महिलेची मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमाला  सर्वोत्कृष्ट सिनेमा,  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री,  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका अशा एकूण सहा श्रेणीत नामांकन मिळालं आहे.

 

Post a Comment

0 Comments