आयपीएल २०२१ मधून तीन परदेशी खेळाडूंनी माघारी घेतली आहे. भारतात कोरना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे या क्रिकेटपटूंनी माघार घेतल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.
सविस्तर माहिती
आयपीएलच्या १४व्या हंगामातून आणखी ३ खेळाडूंनी माघार घेतली आहे. स्पर्धा सुरू असताना देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे कारण देत या खेळाडूंनी मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२१मध्ये आतापर्यंत २० लढती झाल्या आहेत. याआधी काही खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतील होती.
माघार घेतलेले खेळाडू
आयपीएलचा १४वा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू झाला. त्याआधी अनेक खेळाडूंनी कोरना आणि अन्य कारणांमुळे माघार घेतली होती. यात जोश हेजलवूडचा देखील समावेश होता. तर काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन याने बाबो बबलमुळे थकवा आल्याचे कारण देत माघार घेतली होती.
0 Comments