औरंगाबाद :
जातीभेदाला मुठमाती घातल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. एका हिंदू तरुणाच्या मृतदेहाला मुस्लिमांनी खांदा देत विधिवत अंत्यविधी केली आहे.
औरंगाबादच्या सराफा रस्त्यावर राहणाऱ्या १५ वर्षीय मुलगा सुबोह हा दिव्यांग होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. आजारपणामुळे त्याचा मृत्यू २० एप्रिलला झाला. मुलाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याच्या संशयाने अनेकांनी अंत्यविधीला जाणे टाळले. त्यामुळे त्यांना खांदेकरी मिळत नव्हते. मात्र, त्या गृहस्थाच्या नूर इस्लाम शेख या मित्राने त्यांना साथ दिली.
यावेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी मिळाली नाही. ही माहिती नूर यांना कळली त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते अलीम बेग यांना सोबत घेऊन घोडाई यांना धीर दिला. सिटी चौक पोलिसांत धाव घेत त्यांनी सत्यता पोलिसांसमोर मांडली आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून अंत्यसंस्काराला परवानगी मिळवली. दुपारच्या सुमारास हिंदू रितीरिवाजाप्रमाणे कैलासनगर स्मशानभूमीत आणून अंत्यसंस्कार करायला मदत केली.
0 Comments