धक्कादायक! "स्वयंपाक केला नाही म्हणून बॅटने पत्नीला बेदम मारहाण उपचारादरम्यान मृत्यू"


सांगली:

स्वयंपाक न केल्याच्या किरकोळ कारणावरुन पतीने पत्नीला बॅटने बेदम मारहाण केली.  सांगली जिल्ह्याच्या कुपवाड भागातील अहिल्यानगर झोपडपट्टीत हा प्रकार घडला. कोमल आणि राहुल हे दाम्पत्य कुपवाड इथल्या अहिल्यानगर झोपडपट्टीत राहत होतं. स्वयंपाक न केल्याच्या किरकोळ कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. 
यात पत्नी कोमल राहुल जाधवचा (वय २१ वर्षे) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती राहुल बाळासो जाधवला (वय २५ वर्षे) अटक केली आहे.

 कोमलला उपचारांसाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान कोमलची प्राणज्योत मालवली. यानंतर कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात पती राहुल जाधव याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन त्या अटक करण्यात आली आहे. कुपवाड एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments