सध्या कोरोनाने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात लॉकडाऊनच्या सूचना दिल्या आहेत. मात्र लसीचा तुटवडा, बेड उपलब्ध नाहीत आणि ऑक्सिजनची कमी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहेत. अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
सगळ्यात मोठी “कीड” जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे “राजकारण” ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या “कीड”पासून बचाव करता आला तर बघा! अवघड आहे सगळंच…काळजी घ्या, असं तेजस्विनी पंडीतने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे, लॉकडाऊन घोषणा असली तरी कठोर निर्बन्ध लादले आहेत. जबाबदार नागरिक म्हणून कोरोनाचे नियम आला पाळून चला हद्दपार करणे गरजेचे आहे.
0 Comments