पुणे: कोरोना मुळे सगळंच जीवन मान बिघडले आहे, मुलांचं शिक्षणही ऑनलाइन पद्धतीने गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. असंच शिक्षण घेण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील पालकाने आपल्या ११ वर्षांच्या मुलीला नवीन मोबाईल घेऊन दिला पण त्यानंतर भलताच धक्कादायक प्रकार त्यांच्यासमोर आला.
मुलांना एवढ्या सोयीसुविधा दिल्यानंतर त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याचंही काम पालकांंचं आहे. पिंपरी चिंचवडमधील एका व्यक्तीने आपल्या मुलीला ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी नवीन मोबाईल घेऊन दिला, एकदा सहज तो फोन त्यांनी बघितला तर त्यामध्ये आपल्याच मुलीचा अश्लील व्हिडिओ पाहून त्यांना धक्काच बसला.
मुलीकडे या प्रकरणाची चौकशी केली तर तिने असं सांगितलं, की मला एक ई-मेल आला होता. ज्यामध्ये लिहिलं होतं की जर तू तुझा अश्लील व्हिडिओ पाठवला नाही तर तुझ्या घरच्यांना जीवे मारू, त्यामुळे मी घाबरून त्यांना व्हिडिओ पाठवल्याचं मुलीने आपल्या वडिलांना सांगितलं. त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलीला घेऊन पिंपरी चिंचवड सायबर पोलीस विभागात तक्रार दाखल केली.
त्यानंतर तिचं एका मुलाशी अश्लील संभाषण होत असलेली इन्स्टाग्राम चाट पोलिसांच्या समोर आली. यावर त्या मुलीने ते संभाषण होत असलेलं अकाउंट माझं आहे पण ते मी वापरत नसून माझी एक मैत्रिण वापरते असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांना मुलीवर संशय आल्याने तिची आणखी चौकशी करून आणि ज्या मुलाबरोबर हे संभाषण झालं त्या मुलाची चौकशी केल्यानंतर त्या मुलीने स्वतःचा अश्लील व्हिडीओ केला असल्याचं तपासात स्पष्ट झालं. या घटनेमुळे शाळकरी मुलंही अशाप्रकारे बनाव करून कशी फसवणूक करत आहेत ते दिसून येत आहे त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर काटेकोर लक्ष देण्याची गरज असल्याचं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितलं.
0 Comments